Header Navigation

Tuesday, November 5, 2013

नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर!

Narendra Modi
बिहारच्या पाटण्यातील हुंकार रॅलीनंतरभाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील सभाही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा इशारा इंटॅलिजन्स ब्युरोने (आयबी)जारी केला आहे.भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलासोबत होणार असलेल्या या सभेत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, अशा आशयाचा अलर्ट आयबीने पंजाब पोलिसांना दिला आहे. दरम्यान, येत्या ८ नोव्हेंबर रोजी होणार्‍या उत्तरप्रदेशच्या बहराईच येथील मोदींच्या सभेसाठीही आयबीने अशाच प्रकारचा इशारा जारी केला आहे.

 Read More Visit  Tarun Bharat ePaper

No comments:

Post a Comment